संविधान डिबेट चे वाचन 56 तासात 65 अनूछेदाचे वाचन
26 मे ला सायंकाळी 5 वाजता समाज कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, बार्टी प्रशासन व दिशा ह्यूमन वेल्फेआर असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर मध्ये 23 मे पासून संविधान डिबेट्स चे वाचन सुरू असून आज सायंकाळी 6 पर्यंत 56 तासात 65 व्यक्तींनी 70 अनुच्छेदांचे वाचन केलेले आहे. उर्वरित अनुच्छेदाचे वाचन रात्रभर होणार आहे. संविधानाच्या हीरक महोत्सवा निमित्त कही हम भूल ना जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत 75 वर्ष, 75 कलम, 75 तास व 75 + अशा प्रकारचे आयोजन असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्या 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, आंबेडकरी चळवळीतील बळवंत वराडे यांच्या परिवारातील मालती वराडे व सविधान डीबेटचे अनुवादक प्रा देविदास घोडेस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वामन सोमकुवर व उत्तम शेवडे यांनी दिली.
24 मे रात्री व 25 मे ला दिवसभर
डॉ एम एस कळमकर, वर्षा टेंभेकर, प्रमिला थोरात, पल्लवी दाणीखान, अलका चौकीकर, दीक्षित आवळे, मनीषा जामगडे, कल्पना तेलंग, माया मोहाळे, मृणालिनी दहिवडे, संध्या मेश्राम, रोहित फुलझेले, सुहासिनी गायकवाड, सिद्धार्थ वाडकर, रोशन राऊत, एड विलास राऊत, ओजस्वी मेश्राम, भावेश गजभिये, अड ज्योती वालदे, एड विशाखा मेश्राम, जयंत साठे, नरेश महाजन, यशस्वी नंदनवार, प्रा देवराव नंदनवार, सुन्नीलाल जांभूळकर, दीप्ती रंगारी, अजातशत्रू भगत, सुलभा चव्हाण, निर्मला वाघधरे, महिपाल सांगोळे, नरेश साखरे, एड रमेश राठोड, निरंजन पाटील, संध्या राजूरकर, संगीत माधुरी गायधने, प्रा मनीष वानखेडे, सुनयना खाडे, ज्योती बर्गड अमरावती, महेंद्र तिरपुडे, प्राची बोरकर, ओशीन कराडे, डॉ सरोज डांगे, सुप्रिया घोडके आदींनी रात्रभर व आज दिवसभर डिबेट्सचे वाचन केले.
या वाचनाची वैशिष्ट्य असे की वाचणाऱ्यांची संख्या अधिक वाढल्याने एक एक अनुच्छेद तीन-तीन व्यक्तींनी मिळून वाचन केले. एवढेच नव्हे तर कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मराठी सोबतच हिंदी व इंग्रजी वाचनासाठी पुढाकार घेतला. रात्री तर वकिलांच्या टीमने वाचनात पुढाकार घेतला. आज रविवार असल्याने सभागृहात उपस्थितांची, श्रोत्यांची व वाचकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.