सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

उत्तर नागपूर येथील या गटारीच्या चेंबर मधून निघतोय विषारी धूर !

उत्तर नागपूर येथील या गटारीच्या चेंबर मधून निघतोय विषारी धूर !

नागपूर : वैशालीनगर येथील गटारीच्या चेंबर मधून अचानक विषारी धूर निघाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरा शेजारी हे गटारी चे चेंबर आहे.

सविस्तर वृत्त असे, की उत्तर नागपूर भागात वैशालीनगर परिसर आहे. येथील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून मनपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानात दररोज हजारोच्या संख्येने नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ करायला येतात. बुधवार (२४ सप्टेंबर) रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याना शेजारी असलेल्या गटारीच्या चेंबर मधून नागरिकांना धूर निघताना दिसला. या धूळामूळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

शेजारी चिल्लर दुकानांची चाळ आहे. त्या दुकांदारांमध्ये पळापळीची स्थिती निर्माण झाली होती. काही जागृत नागरिकांनी मनपा आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी केला. तत्काळ मनपा आशीनगर झोनचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी गटारीचे चेंबर ओपन केले. त्या चेंबर मधून विषारी धूर निघताना दिसली. गटारीच्या चेंबरचा रंग त्या धूरी मुळे संपूर्ण पिवळा झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यानी सुद्धा गटारी मधून निघणाऱ्या धूरीचे परिक्षण केले.

तो धूर आरोग्याला घातक असल्याचे त्या अधिकाऱ्यांच्या परिक्षणा मध्ये सिद्ध झाले. शेजारी कैमिकलचा कारखाना आहे. त्याचे कैमिकलचे पानी गटारी मध्ये येत असल्याने गटारीच्या चेंबर मधून धूर येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या कारखान्याच्या मालकावर मनपा आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कैमिकल कारखान्याच्या मालकावर कारवाई करण्यापेक्षा त्या कारखान्याला कुलूप ठोका अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा एखादे वेळी कैमिकल कारखान्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, असेही जागृत नागरिकांनी सांगितले.

 

 

 

- Advertisment -