विद्यार्थ्यांनो मोबाईल पासून दुर रहा–डॉ. निलेश काळे
रामटेक : मोबाईल पासून विद्यार्थ्यांनो दुर रहा. मोबाइल मुळे तुमचे मानसिक, शारीरीक, शैक्षणिक नुकसान होऊ शकते. असा सल्ला एड्डसन फाऊंडेशन चे अध्यक्ष व प्रसिद्ध विद्यार्थी समुपदेशक डॉ. निलेश काळे यांनी दिला. पंचायत समिती रामटेक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पंचाळा (बु.) येथे विद्यार्थ्यांना काळे हे मार्गदर्शन करीत होते.
डॉ. काळे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवण्यापेक्षा वाचन, खेळ आणि सृजनशील उपक्रमांचा छंद जोपासावा, असे सांगितले. मोबाईलचा अति वापर एकाग्रतेवर आणि अभ्यासावर कसा परिणाम करतो, याचे वास्तव उदाहरणांसह त्यांनी प्रभावीपणे विवेचन केले.

डॉ. काळे यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, जीवनकौशल्ये आणि सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, संस्कार अंगीकारल्याने व्यक्तिमत्व सर्वांगीण घडते आणि यशस्वी जीवनासाठी तेच खरे भांडवल ठरते.
प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल माध्यमांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीणजी मोहनकर, देवराव प्रधान, सचिन केंद्रे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक नामदेव राठोड व शिक्षकवृंद निलेश काळे, श्री. सूर्यवंशी, सौ. प्रियंका हिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


