सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चमू कुल्लू येथील राष्ट्रीय सहासी शिबिरात होणार सहभागी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चमू कुल्लू येथील राष्ट्रीय सहासी शिबिरात होणार सहभागी 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची चमू अटल बिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, पिरडी, कुल्लू, हिमाचल प्रदेश येथे दि. १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय सहासी शिबिरात सहभागी होणार आहे. भारत सरकार युवा कार्य आणि खेल मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय, पुणे यांच्या निर्देशानुसार आयोजित शिबिरात विद्यापीठातील ५ विद्यार्थी, ५ विद्यार्थिनी आणि एक कार्यक्रम अधिकारी हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

या चमूत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हर्षल रोकडे, शितल लिल्हारे, शिवांश, आदेश मरापे, निशिकेत अरखराव, कु. नमिता पुडके, कु. नैनिका भट्टाचारजी, कु. वैष्णवी जोंधळे, कु. वंशिका नंदागवळी, कु. ताहुरा फिरदोस, कु. काजल क्षीरसागर अशा दहा विद्यार्थ्यांचा समावेश असून विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विभागीय समन्वयक डॉ. संजय सिंगनजुडे हे संघ व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एक संघ व्यवस्थापक आणि ३ विद्यार्थी आणि ३ विद्यार्थिनी तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील प्रत्येकी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनींचा समावेश आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना, संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी निवड झालेल्या सर्वांशी हितगुज करून मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. राकेश कबे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन आणि रासेयो विभागाचे सदस्य श्री प्रकाश शुक्ला, श्री प्रवीण साखरे, श्री स्वप्निल खरे यांनीही याप्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची चमू गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून राष्ट्रीय सहासी शिबिराकरिता रवाना होईल.

 

 

- Advertisment -