सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

दीक्षाभूमी विकासाचा कुठलाही आराखडा मंजूर केला नाही !

दीक्षाभूमी विकासाचा कुठलाही आराखडा मंजूर केला नाही !

oplus_2097152

नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीने दीक्षाभूमी विकासाचा तिसऱ्या क्रमांकाचा आराखडा स्वीकारला असल्याची बातमी वृत्तपत्रात दोनदा प्रकाशित झाली होती. परंतु यासंदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीची कोणतीही बैठक बोलाविण्यात आली नाही. किंवा समितीच्या कोणत्या सदस्यांसोबत चर्चा देखील झाली नाही. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा आराखडा मंजूर करण्याचा प्रश्नच येत नाही.

 

मे. डिझाईन असोसिएट्स इन कार्पोरेशन, नोएडा यांनी भूमिगत कामे वगळून इतर विकासकामाचे चार आराखडे समितीला ०८ सप्टेंबर २०२५ रोजी दीक्षाभूमी स्मारक समितीला सादर केले होते. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाचा आरखडा स्वीकारला अशी बातमी आज देखील प्रकाशित झाली. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी त्वरित समितीची बैठक घेऊन त्यावर चर्चा करून समितीची मंजुरी घ्यायला हवी होती. परंतु समितीची बैठकच घेण्यात आली नाही. त्यामुळे समितीचे सर्व सदस्य या तिसऱ्या क्रमांकाचा आराखड्याबाबत अनभिज्ञ आहेत.

विशेष म्हणजे दीक्षाभूमीच्या पश्चिम प्रवेशद्वारा जवळ थायलंड मधील ५६ फुटाच्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्याबाबत बातमी आली आहे. दीक्षाभूमी परिसरात पाच बुद्ध मूर्ती आहेत. दीक्षाभूमीवर दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत आहे. लोकाना दीक्षाभूमीची जागा कमी पडत आहे. त्यामुळे स्तूपाच्या बाजूला बुद्ध मूर्ती न लावता शासनाकडून बाजूची जागा मागून तेथे बुद्ध मूर्ती लावणे उचित ठरेल.

नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाचर आयुक्त यांच्या कार्यालयात दीक्षाभूमीच्या सुधारित विकास आराखडा मंजुरीस्तव उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्याच्या संदर्भात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुधारित विकास आराखडा निश्चित करण्याबाबत समाज कल्याण विभाग, दीक्षाभूमी स्मारक समिती, मे. डिझाईन असोसिएट्स इन कॉर्पोरेशन यांची त्वरित बैठक घेऊन आराखड्यास मंजुरी द्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता.

oplus_6291456
oplus_6291456

दीक्षाभूमी स्मारक समिती, मे. डिझाईन असोसिएट्स इन कॉर्पोरेशन, आणि एनएमआरडी या सर्वाची सयुक्त बैठक समाज कल्याण विभागाने बोलावून त्यामध्ये विकासकामाचा आराखड्याबाबत चर्चा करून जो आराखडा योग्य ठरेल तो आराखडा मंजूर करून दीक्षाभूमीच्या विकासाच्या कामास गती देण्यात यावी. ऑक्टोबर महिन्यात नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाचर आयुक्त यांच्यासोबत समितीच्या सदस्यांची बैठक होऊन त्याबैठकीत दीक्षाभूमीच्या भूमीच्या कंपाउंड वॉल आणि सभामंचाचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ते काम सुरू झाले आहे. या बैठकीत मा. संजय मीना, समितीतर्फे डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, मा. एन. आर. सुटे, भन्ते नागदिपांकर, समाजकल्याण विभागाचे मा. देशमुख साहेब, मा. सुकेशिनी तेलगोटे आणि डिझाईन असोसिएट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्मारक समिती आपल्या तर्फे मा. उच्च नयायालयात विधीतज्ञ नियुक्त करुन आठ आठवळ्याचा वेळ मागून समाज कल्याण विभाग डिझाईन अॅण्ड डिझाईन असोसिएट्स स्मारक समिती एन एम आर डी संयुक्तपणे विकास आराखडा मंजूर करुन मा. उच्च न्यायालयास सादर करेल. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाला सुध्दा सादर करेल. पत्र परिषदेला समितीचे विश्वस्तः मा. विलासजी गजघाटे, डॉ. प्रदिप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, एन.आर. सुटे, भन्ते नाग दिपांकर, डी.जी. दाबाळे उपस्थित होते.

 

 

- Advertisment -