नेल्सन लक्सचा नागपुरात शुभारंभ: मातृ व बाल आरोग्यसेवेला नवी दिशा देणारे प्रीमियम हॉस्पिटल
आई आणि बाळांसाठी खास ‘नेल्सन लक्स’ हॉस्पिटलचे नागपुरात उद्घाटन
नागपूर, भारत : नेल्सन ग्रुपने नेल्सन लक्स – प्रीमियम मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटनाची अभिमानाने घोषणा केली आहे. मातांसाठी जागतिक दर्जाचा प्रसूती अनुभव, नवजात बाळांसाठी अत्याधुनिक बालरोग सेवा तसेच आरामदायक सुविधा देणारे हे हॉस्पिटल नागपुरातील पहिलेच असे आरोग्यकेंद्र ठरणार आहे.

“डेशपांडे लेआउट, सेंट्रल अव्हेन्यू येथील नेल्सन लक्स हॉस्पिटलचे उद्घाटन उद्या, रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता, माननीय श्री. नितीन गडकरी जी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी श्री. दत्ता जी मेघे, श्री. सागर जी मेघे आणि हिंगणा विधानसभेचे आमदार श्री. समीर जी मेघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.”
या हॉस्पिटलच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सी.ई.ओ. डॉ. सोनलकुमार भगत यांच्यासह प्रसूतीशास्त्र, नवजात शिशुरोग (निओनॅटोलॉजी), बालरोग, वंध्यत्व उपचार (फर्टिलिटी) आणि स्त्री आरोग्य यासंबंधी वरिष्ठ तज्ज्ञ आणि सल्लागार डॉक्टरांची टीमही उपस्थित होती.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सी.ई.ओ. डॉ. सोनलकुमार भगत यांनी सांगितले,“नेल्सन लक्स हे केवळ हॉस्पिटल नाही, तर एक परिपूर्ण अनुभव आहे. मातांसह बाळांना सर्वोच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देताना, त्यांना उबदार, आरामदायक आणि आलिशान वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या अनुभवी वैद्यकीय डॉक्टरांच्या पाठबळासह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही मध्य भारतात मातृत्व आरोग्यसेवा नव्याने उभारण्याचा प्रयत्न करतो.”
डॉ. सतीश देवपुजारी यांनी सांगितले, “सी.ए. रोडवरील नेल्सन हॉस्पिटल हे मातृ आणि बालरोग सेवेत सुधारणा करण्यासाठी तयार केले गेले आहे, जिथे वैद्यकीय कौशल्यासोबत आराम आणि सन्मान दिला जातो. आमचा उद्देश फक्त उपचार देणे नाही, तर मातांसाठी, नवजात बाळांसाठी आणि कुटुंबांसाठी संपूर्ण काळजीचा अनुभव देणे आहे.”
“बियॉन्ड बर्थिंग” या संकल्पनेतून साकारलेल्या नेल्सन लक्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तज्ज्ञता, आई-बाळांच्या वैयक्तिक गरजेनुसार आखलेली उपचार पद्धती आणि आरामदायक सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्रत्येक आई आणि बाळाला सर्वोच्च दर्जाची काळजी, लक्ष आणि आराम मिळतो.
मातृ आणि बालरोग सेवेत नवीन मापदंड
नेल्सन लक्सची संकल्पना मातांना सर्वांगीण, सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या समाधान देणारा मातृत्वाचा अनुभव देण्यासाठी तयार केली गेली आहे, यामध्ये पुढील सुविधा उपलब्ध आहेत:
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा
लेव्हल III नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट (एनआयसीयू)
आधुनिक लेबर डिलिव्हरी रिकव्हरी (एलडीआर) सूट्स
मुलांसाठी स्वतंत्र बालरोग अतिदक्षता विभाग, मातांसाठी रिकव्हरी रूम्स आणि आपत्कालीन सेवा
आधुनिक मॉनिटरिंग आणि सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज उच्च-तंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर्स
नवीन मातांसाठी आरामदायी सुविधा
हॉटेलसारख्या सुविधा असलेल्या प्रीमियम रूम आणि सूट्स
तणाव कमी करून आराम वाढवणारी शांत आणि आकर्षक अंतर्गत रचना
प्रत्येक आईसाठी खास, वैयक्तिक अनुभव देणारी कस्टमाइज्ड प्रसूती पॅकेजेस
मातृ व बालरोग सेवांचा संपूर्ण पॅकेज
प्रसूती सेवा आणि उच्च धोका असलेल्या गर्भधारणेची काळजी
नवजात शिशु व बालरोग सुपर-स्पेशालिटी सेवा
स्तनपान सल्ला, पोषण मार्गदर्शन आणि प्रसूतीनंतरची काळजी
वंध्यत्व उपचार व महिलांच्या आरोग्यविषयक दवाखाने
नेल्सन ग्रुप बद्दल
नेल्सन ग्रुप अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात विश्वासार्ह नाव आहे. मातृ व बालरोग क्षेत्रात 18 वर्षांहून अधिक काळाच्या अनुभवासह, विशेषतः बालरोग आणि नवजात शिशु काळजीत त्याची ओळख आहे. नेल्सन केवळ या क्षेत्रातील कौशल्यासाठीच नाही, तर भारतभर बालरोग आणि स्त्रीरोग सेवेत नवोपक्रम आणि बदल घडवण्यासाठीही प्रसिद्ध आहे.
नेल्सन हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. सतीश देवपूजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात, जे पेटंट्स आणि संशोधनासाठी संपूर्ण देशभर ओळखले जातात. नेल्सन लक्स या ग्रुपने प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आणि जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा एकत्र करून मातृ आणि बालकल्याणासाठी नवीन मापदंड निर्माण केला आहे.


