सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बुटीबोरी येथे पाण्याची टाकी कोसळली, ३ कामगारांचा मृत्यू ८ कामगार जखमी!

बुटीबोरी येथे पाण्याची टाकी कोसळली, ३ कामगारांचा मृत्यू ८ कामगार जखमी !

बुटीबोरी : नागपूरातील बुटीबोरी एमआयडीसी (MIDC) भागात अवादा कंपनीची निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळ्याने ३ कामगारांचा मृत्यू झाला तर ८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आणखी काही कामगार मलब्याखाली दबल्याची माहिती आहे. शुक्रवार (१९ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, बुटीबोरी एमआयडीसी येथे ‘आवादा’ कंपनी आहे. या कंपनीच्या प्रकल्पास्थळी टँक टावर (पाण्याची टाकी) बनविण्याचे काम सुरू आहे. अचानक सकाळी ११ वाजताच्या सुमारास कामगार काम करीत असताना पाण्याची टाकी कोसळली, या भिषण अपघातात ३ कामगारांचा होळपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मलब्या खाली काही कामगार दबल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतकांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पाण्याच्या टाकीचे काम सुरु असताना टाकीचा तोल गेल्यामुळे ही घटना घडली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने नियमबाह्य पद्धतीने पाण्याची टाकी बसविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप मृतकांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. मलबा उपसण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरु आहे.

 

 

- Advertisment -