भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना महावितरणचे अभिवादन
नागपूर : उत्कृष्ट वक्ता. महान राष्ट्रभक्त, सुशासनाचे प्रतीक आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त (सुशासन दिन) महावितरणतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल रोड येथील विद्युत भवन येथे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले, यावेळी नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांच्यासह महावितरणचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अएपण करुन अभिवादन केले.


