सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख तिवारी शिवसेनेत

उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख तिवारी शिवसेनेत

आमदार तुमाने यांच्या उपस्थितीत प्रवेश 

नागपूर : उबाठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख (नागपूर शहर) शशिधर तिवारी यांनी आमदार श्री कृपाल तुमाने तसेच युवासेनेचे महाराष्ट्र सचिव श्री शुभम नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी आमदार तुमाने यांनी शशिधर तिवारी यांच्या गळ्यात शिवसेनेचा दुप्पटा घालून त्यांचे पक्षात जाहीर स्वागत केले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याच सोहळ्यात दीपक बबनराव झोडे आणि सागर बरडे यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश करत संघटनेला बळकटी दिली. पक्षप्रवेशानंतर बोलताना नव्याने दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर ठाम राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पक्षवाढ, संघटन मजबूत करणे आणि जनतेसाठी प्रभावी काम करण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा पक्षप्रवेश नागपूर शहर सहसंघटक अमित कातुरे, पूर्व विदर्भ समन्वयक श्री हितेश यादव यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडला. या प्रवेशामुळे नागपूर शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

- Advertisment -