सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मैक्स हॉस्पिटल, नागपूरने निरोगी जीवनशैली आणि कर्करोग जनजागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन केले

मैक्स हॉस्पिटल, नागपूरने निरोगी जीवनशैली आणि कर्करोग जनजागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन केले

नागपूर : वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त जनजागृतीचा ठोस संदेश देत मैक्स हॉस्पिटल, नागपूरने कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध वयोगट आणि क्षेत्रांतील लोक एकत्र येत निरोगी आणि कर्करोग-जागरूक समाजासाठी सामूहिक संकल्प व्यक्त केला.

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी लवकर निदान, प्रतिबंधात्मक काळजी आणि सक्रिय जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. सहभागी नागरिकांनी ठरवलेल्या मार्गावर जोशात सायकल चालवत एकजूट आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठीची बांधिलकी दर्शवली.

यावेळी बोलताना प्रख्यात इंटरनॅशनल सायकलिस्ट आणि एन्ड्युरन्स ऍथलेट डॉ. अमित समर्थ म्हणाले, “कर्करोग हा आता आशाहीन आजार राहिलेला नाही. वैद्यकीय विज्ञानातील प्रगती, लवकर निदान आणि निरोगी सवयींचा अवलंब यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग टाळता येऊ शकतात. अशा सायक्लोथॉनसारख्या उपक्रमांमुळे जनजागृती वाढवण्यास आणि लोकांना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते.”

मैक्स हॉस्पिटल, नागपूरचे कर्करोग तज्ज्ञ कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून सहभागींसोबत संवाद साधत कर्करोग प्रतिबंध, तपासणी आणि उपचारांविषयी मौल्यवान मार्गदर्शन दिले. तज्ज्ञ पॅनेलमध्ये डॉ. अमोल डोंगरे, डायरेक्टर –मेडिकल ऑन्कोलॉजी; डॉ. शिझान परवेज, असोसिएट डायरेक्टर – रेडिएशन ऑन्कोलॉजी व रेडिओसर्जरी; डॉ.कवडू जवादे, कन्सल्टंट – सर्जिकल ऑन्कोलॉजी तसेच मैक्स हॉस्पिटल, नागपूरचे इतर कन्सल्टंट डॉक्टरांचा समावेश होता.

डॉ.अमोल डोंगरे,डायरेक्टर – मेडिकल ऑन्कोलॉजी,मैक्स हॉस्पिटल, नागपूर म्हणाले, “सुमारे एक-तृतीयांश कर्करोग वेळेवर तपासणी, लवकर निदान आणि नियमित व्यायाम, संतुलित आहार तसेच तंबाखूचे सेवन टाळणे यांसारख्या साध्या जीवनशैलीतील बदलांमुळे टाळता येऊ शकतात. अशा सायक्लोथॉनसारख्या उपक्रमांमुळे वैद्यकीय ज्ञान आणि समाजातील जागरूकता यामधील दरी कमी होते आणि लोकांना दीर्घकालीन आरोग्यासाठी सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहन मिळते.”

या कार्यक्रमात विद्यार्थी, कामकाज करणारे व्यावसायिक, सायकलप्रेमी, तसेच मैक्स हॉस्पिटल, नागपूरचे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यासह ५०० हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे हा खऱ्या अर्थाने समुदाय-केंद्रित उपक्रम ठरला.

सायक्लोथॉनचा समारोप उत्साही वातावरणात झाला. यामध्ये आरजे संवाद, झुंबा सत्र आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांसारख्या आकर्षक उपक्रमांचा समावेश होता. लकी ड्रॉमुळे कार्यक्रमात अधिक उत्सुकता निर्माण झाली, ज्यामध्ये सहभागींसाठी नवीन सायकल जिंकण्याची संधी उपलब्ध होती.

या उपक्रमाद्वारे मैक्स हॉस्पिटल, नागपूरने समुदाय आरोग्य, कर्करोग जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आणि योग्य वेळी कृती व निरोगी सवयी जीवन वाचवू शकतात हा संदेश दिला.

- Advertisment -