सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

एमएमटीसी-पीएएमपीने नागपूरमध्ये त्यांचे पहिले एक्सक्लुझिव्ह स्टोअर लाँच केले

एमएमटीसी-पॅम्प ने नागपूरमध्ये आपले पहिले एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरू केले; 24K, 999.9+ शुद्धतेच्या सोने-चांदीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ उपलब्ध

एमएमटीसी-पॅम्प देशव्यापी विस्ताराच्या धोरणात नागपूरचा समावेश हा महत्त्वाचा टप्पा ठरला असून, “स्विस उत्कृष्टता – मेक इन इंडिया” या संकल्पनेतून ग्राहकांना अधिक सुलभ आणि उत्कृष्ट अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

एमएमटीसी-पॅम्प चीगोल्ड (24K) आणि सिल्व्हर उत्पादने भारतातील 999.9+ शुद्धतेच्या मानकांसाठी ओळखली जातात.

नागपूरमधील ग्राहकांना आता आपले जुने सोने तज्ज्ञांकडून तपासून घेण्याची आणि  एमएमटीसी-पॅम्प च्या पारदर्शक प्रक्रियेद्वारे ते विकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रक्रियेमुळे सोन्याचे खरे मूल्य अचूकपणे निश्चित होण्याची खात्री दिली जाते.

नागपूर : भारतातील एलबीएमए-मान्यताप्राप्त आणि गुड डिलिव्हरी दर्जा असलेली देशातील एकमेव सोने-चांदी रिफायनर कंपनी एमएमटीसी-पॅम्प ने नागपूरमध्ये आपला विस्तार करण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. सोने-चांदीबद्दल असलेल्या शहराच्या सांस्कृतिक जिव्हाळ्याला लक्षात घेऊन कंपनीने येथे आपले पहिले ‘प्युरिटी व्हेरिफिकेशन सेंटर (पीव्हीसी)’ सुरू केले आहे. यामुळे विश्वास, शुद्धता आणि प्रामाणिकतेची आपली परंपरा अधिक दृढ करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

 

ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी या केंद्रात 999.9+ शुद्धतेचे सोने (24K) आणि चांदी यांची विविध उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमएमटीसी-पॅम्प च्या नागपूरमधील आगमनामुळे उच्च दर्जाच्या सोने-चांदीच्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होणार असून, फाइनेस्ट स्विस क्राफ्टमनशीपचा दर्जाही ग्राहकांना अनुभवता येणार आहे.

या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर कंपनी शुद्ध सोने आणि चांदीच्या नाणी व बार्स यांचा वेगळा पोर्टफोलिओही सादर करणार आहे. यात क्लासिक, डिव्होशनल, कलेक्टिबल्स आणि गिफ्टींग या श्रेणींचा समावेश असेल. याशिवाय ग्राहकांना आता आपले जुने सोने आणि चांदी तज्ज्ञांकडून तपासून घेण्याची आणि एमएमटीसी-पॅम्प बाय-बॅक सर्विसद्वारे ते विकण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कंपनीची पारदर्शक प्रक्रिया ग्राहकांच्या मौल्यवान धातूंचे खरे मूल्य अचूकपणे निश्चित करण्याची खात्री देते.

ही मूल्यांकन प्रक्रिया एमएमटीसी-पॅम्प च्या जर्मन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरवर आधारित असून, पारंपरिक टचस्टोन पद्धतीत होणारा मूल्यहानीचा धोका टाळत अत्यंत अचूक मूल्यांकन सुनिश्चित करते.

नागपूर स्टोअरचा पत्ता: शॉप नं. 101 आणि 127, पहिला मजला, रतन मार्केट, इतवारी, नागपूर – 440002,  टांगा स्टँडसमोर. संपर्क क्रमांक:  रमेश – 8886502120  पी.सी. महातना – 81309 81098

या घोषणेबाबत बोलताना एमएमटीसी-पॅम्प चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समित गुहा म्हणाले,  “नागपूरमध्ये आमचे पहिले एक्सक्लुझिव्ह प्युरिटी व्हेरिफिकेशन सेंटर (PVC) सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या आणि ग्राहकांना अधिक सुलभता व विश्वास देण्याच्या एमएमटीसी-पॅम्प च्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सोने आणि चांदीबद्दल नागपूरमध्ये असलेला पारंपरिक जिव्हाळा लक्षात घेता ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. या पीव्हीसीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तडजोड न करणाऱ्या शुद्धतेच्या मानकांच्या आधारावर ग्राहकांना सुलभ व पारदर्शक इन-स्टोअर अनुभव देण्याचा आमचा उद्देश आहे. सोने आणि चांदी या दोन्हींसाठी एलबीएमए-मान्यताप्राप्त गुड डिलिव्हरी रिफायनर असलेली भारतातील एकमेव कंपनी म्हणून, जागतिक दर्जाची शुद्धता आणि उत्कृष्ट स्विस कारागिरी नागपूरमध्ये आणताना आम्हाला अभिमान वाटतो. या उद्घाटनामुळे उत्कृष्ट सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळ मिळेल आणि भारतातील मौल्यवान धातूंच्या परिसंस्थेत आमचे नेतृत्व अधिक मजबूत होईल.”

2008 मध्ये स्थापन झालेल्या एमएमटीसी-पॅम्प ने भारतात मौल्यवान धातूंसाठी एकमेव पूर्णपणे एकात्मिक परिसंस्था उभारली आहे. यामध्ये डिजिटल गोल्ड व सिल्व्हर, बुलियन (गोल्ड व सिल्व्हर), मिंटेड कॉइन्स (गोल्ड व सिल्व्हर), जुने सोने बाय-बॅक आणि रीसायकलिंग अशा विविध सेवांचा समावेश आहे. डिजिटल गोल्ड क्षेत्रात एमएमटीसी-पॅम्प आधीच भारतातील अग्रणी कंपनी असून देशभरात तिचा मजबूत ग्राहकवर्ग आहे. देशव्यापी उपस्थिती अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्राहकांना अखंड व सुलभ अनुभव देण्यासाठी कंपनीने महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा मानस आहे. अलीकडेच एमएमटीसी-पॅम्प ने दिल्ली, गाझियाबाद, नोएडा आणि लुधियाना येथे नवी केंद्रे सुरू केली असून शुद्ध आणि विश्वासार्ह सोने-चांदीच्या उत्पादनांच्या शोधात असलेल्या ग्राहकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

उच्च दर्जाची आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीसाठी एमएमटीसी-पॅम्प ओळखली जाते. सोने आणि चांदीशी संबंधित सर्व गरजांसाठी एकाच ठिकाणी शॉपिंग म्हणून कंपनीने हा उपक्रम आणला आहे. कंपनीकडून तयार केलेले प्रत्येक उत्पादन कठोर शुद्धीकरण प्रक्रियेतून जाते, ज्यामुळे धातूची 999.9+ शुद्धता सुनिश्चित केली जाते.

उत्पादनाची प्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक एमएमटीसी-पॅम्प उत्पादनावर एक अद्वितीय क्रमांक दिलेला असतो आणि ते अस्सायर प्रमाणित सर्टिकार्डसह पॅकेज केलेले असते. याशिवाय कंपनीकडून खरेदी केलेले प्रत्येक सोने आणि चांदीच्या उत्पादनाचे जितके वजन लिहिले आहे, त्यापेक्षा कमी नाही — थोडे जास्तच मिळते.  म्हणजे ग्राहकाने घेतलेले प्रत्येक नाणे किंवा बार नमूद वजनापेक्षा किंचित जास्त वजनाचे असते. त्यामुळे ग्राहकांच्या गुंतवणुकीला अधिक मूल्य मिळण्याची खात्री दिली जाते.

या हंगामात शुद्धतेच्या उच्चतम दर्जाची सोने आणि चांदीची विविध उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. ही उत्पादने एमएमटीसी-पॅम्प च्या एक्सक्लुझिव्ह स्टोअर्समधून, प्रमुख ज्वेलर भागीदारांकडून तसेच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसवरून खरेदी करता येतात. याशिवाय ग्राहकांना ती थेट एमएमटीसी-पॅम्प अधिकृत संकेतस्थळावरूनही खरेदी करण्याची सुविधा आहे – https://www.mmtcpamp.com

- Advertisment -