सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मेजर हेमंत जकाते समाजसमर्पित जीवन जगले!

मेजर हेमंत जकाते समाजसमर्पित जीवन जगले

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

श्रद्धांजली सभेतून आठवणींनी दिला उजाळा

नागपूर – भारतीय सैन्यातील निवृत्त लष्करी अधिकारी स्व. मेजर हेमंत जकाते अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी समर्पित जीवन जगले, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

वर्धा मार्गावरील एनरिको हाईट्स येथे दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात स्व. मेजर हेमंत जकाते यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी डॉ. सागर खादीवाला, कलामंच संस्थेचे नरेंद्र सतिजा, ब्रिगेडियर सुनील गावपांडे, प्रहार समाज जागृती संस्थे सचिव फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, पंचवटी वृद्धाश्रमातील श्रीमती टिकेकर, डॉ. भावना लाड, अमित थत्ते आदींची उपस्थिती होती.

 

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘माझ्या कुटुंबाशी दिवंगत मेजर हेमंत जकाते व सुलभा जकाते यांच्याशी विशेष नाते होते. माझ्या आईसोबत त्यांचा नियमीत संपर्क होता. आईच्या नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू केल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांनी साडेसात लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली. गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी या देणगीचा उपयोग होणार आहे, याचे समाधान त्यांनी व्यक्त केले होते.’ सामाजिक जबाबदारी, सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक कटिबद्धता या तिन्ही गोष्टी त्यांनी आयुष्यभर जपल्या. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजाची सेवा केली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची तळमळ त्यांच्यात होती. नाव-पद-प्रतिष्ठा मिळावी, यासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा समाजाला फायदा व्हावा, या उद्देशाने त्यांनी कार्य केले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात आणखी अशी व्यक्तीमत्व घडावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे,’, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

यावेळी श्रीमती टिकेकर यांनी मेजर जकाते यांच्या जीवनाचा परिचय करून दिला तसेच पंचवटी वृद्धाश्रमातील आठवणींना उजाळा दिला. शिवाली देशपांडे यांनी प्रहार जागृती संस्थेला केलेल्या सहकार्याबद्दल सांगितले. अमित थत्ते यांनी मेजर हेमंत जकाते यांच्या व्यक्तिमत्वाचे अनोखे पैलू उलगडले. डॉ. भावना लाड यांनीही आठवणींना उजाळा दिला. डॉ. सागर खादीवाला आणि नरेंद्र सतिजा यांनी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मेजर जकाते यांचे योगदान सांगितले.

- Advertisment -